बातम्या
पावसाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे
By nisha patil - 6/15/2024 6:28:07 AM
Share This News:
सर्वत्र पावसाळा सुरु झाला आहे. अशा स्थितीत नळाला पिण्याचे पाणी गढूळ येणे ही सामान्य समस्या आहे, म्हणूनच पावसाळ्यात उकळून पाणी प्यावे. गरम पाण्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण दिवसभर गरम पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तसेच हे कितपत योग्य आहे? दिवसभर गरम पाणी पिल्याने शरीरावर काय परीणाम होतात हे जाणून घेउया.
गरम पाणी पिण्याचे फायदे
◆ अनेकांना बद्धकोष्ठता, ॲसिडिटी तसेच पोट साफ न होण्याची तक्रार असते. अशावेळी गरम पाणी पिणे फायदेशीर मानले जाते, यामुळे पोटातील घाण निघून जाते, आणि दिवसभर ताजेतवाने ठेवते.
◆ गरम पाणी पिण्याने शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. गरम पाण्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि घाम येतो. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास फायदा होतो. तसेच सर्दी कफ झाला असेल तर गरम पाणी प्यायल्याने बराच आराम मिळतो.
◆ वाढत्या वयात त्वचेशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात, अशीच एक समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे. पण नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने त्वचेतील पेशी उत्तेजित राहतात आणि त्या सुरकुतण्याची क्रिया काहीशी मंदावते. त्यामुळे गरम पाणी प्यायल्यास त्वचा मऊ तर दिसतेच, शिवाय दिर्घकाळ तरुण दिसण्यास मदत होते.
◆ वजन कमी करण्यासाठी देखील गरम पाणी फायद्याचे आहे. सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
◆ जर सर्दी किंवा घशाशी निगडीत काही अॅलर्जी झाली असेल तर गरम पाण्याने ती दूर होण्यास मदत होते. त्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून आपली सुटका होते. सायनस मध्ये सुधारणा होते आणि श्वसनक्रिया सुरळीत होण्यास याचा फायदा होतो.
गरम पाणी पिण्याचे तोटे
◆ पाणी खूप जास्त गरम असेल तर जीभेला त्याचा त्रास होऊ शकतो. जीभ भाजली गेली तर चवही जाण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो जास्त गरम पाणी पिणे टाळले पाहिजे, पाणी गरम करून थंड करून पिले पाहिजे.
◆ शरीराच्या आत असणाऱ्या अन्ननलिका, पोट यांच्यासाठीही खूप गरम पाणी चांगले नाही. त्यामुळे या अवयवांना काही त्रास होण्याची शक्यता असते.
◆ एकदम झोपायच्या आधी गरम पाणी प्यायल्याने झोपेची सायकल बिघडू शकते. त्यामुळे जास्त गरम पिणे टाळले पाहिजे.
पावसाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे
|