बातम्या

आठवड्यातून एकदा उपाशी राहण्याचे फायदे.....

Benefits of fasting once a week


By nisha patil - 5/27/2024 6:21:55 AM
Share This News:



आपण जर एक आठवड्यातून एकदा उपाशी राहिल्यास आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतील. 

आपणास हे फायदे कळल्यावर आपण हे नक्कीच कराल...

*आठवड्यातून एक दिवस उपाशी राहिल्याने शरीराची अंतर्गत शुद्धी होते. तसेच शरीरातील विषारी द्रव्ये उत्सर्जित होऊन शरीर निरोगी राहते.

*आठवड्यातून एकदा उपाशी राहून आपण अपचन, अतिसार, बद्धकोष्ठता, आंबटपणा, जळजळ होण्या सारख्या त्रासा पासून मुक्त होऊ शकता. अश्या वेळी फळांचे सेवन पण आपण करू शकता.

*एक दिवस उपाशी राहण्यामुळे आपले उच्च रक्तदाब आणि कॉलेस्ट्रालचे स्तर नियंत्रित होते आणि या पासून उध्दभवणाऱ्या त्रासा पासून मुक्ती मिळते.

*आठवड्यातून किमान एक दिवशी उपाशी राहण्याने कॉलेस्ट्राल कमी होते. जे हृदयाचे त्रासा पासून वाचवते.

*पचनतंत्र चांगले राहण्यासाठी आपण एक दिवस जेवण्याचे टाळले पाहिजे. असे केल्यास पाचनतंत्राचा त्रास उध्दभवत नाही आणि आपले पचनतंत्र सुरळीत राहते आणि चांगले कार्य करते.
 


आठवड्यातून एकदा उपाशी राहण्याचे फायदे.....