बातम्या

कंदमूळ त्याचे फायदे.

Benefits of tuber root


By nisha patil - 12/7/2024 7:32:46 AM
Share This News:



 जमिनीखाली वाढणाऱ्या वनस्पतींना कंदमूळं असं म्हणतात. अश्मयुगात माणसं फक्त फळं आणि कंदमूळंच खात असत. आजकाल मात्र फक्त उपवासाच्या दिवशी अथवा सॅलेडमधून कंदमूळं खाण्याची पद्धत आहे. जमिनीखाली दडलेल्या या कंदमूळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व  असतात. ज्यामुळे तुम्हाला त्वरीत ऊर्जा मिळू शकते. भारतात बटाटा, रताळी, गाजर, बीट, अरवी, सुरण अशी अनेक कंदमूळं आढळतात. यासाठीच जाणून घ्या रोजच्या आहारात कंदमुळांचा समावेश करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे.

बटाटा
स्वयंपाकघरात बटाटा हे कंदमूळ आवर्जून आढळतं. बटाट्याचे विविध प्रकार आपण नेहमीच तयार करत असतो. शिवाय डाळ, सांबर, भाजी, पराठा, काप, भजी करण्यासाठी बटाट्याचा वापर केला जातो. घाईघाईत केलेली अगदी साधी बटाट्याची भाजीदेखील जेवणाला एक मस्त रूचकर चव आणते. मात्र या बटाट्यामध्ये उत्तम अशी पोषकतत्व दडलेली असतात. बटाटा खाण्याने वजन वाढते या गैरसमजापोटी अनेकजण बटाटा खाणं टाळतात. उत्तम आरोग्यासाठी बटाट्याचे तळलेले पदार्थ खाणं नक्कीच टाळायला हवं. मात्र बटाटा उकडून खाण्यास काहीच हरकत नाही. बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेड, फायबर्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6 असते. ज्यामुळे तुमचे योग्य पद्धतीने पोषण होऊ शकते.

रताळं

रताळं हे भारतात पिकणारं आणखी एक महत्त्वाचं कंदमूळ आहे. रताळी बाहेरून पांढरी आणि आतून लाल रंगाची असतात. पचनास हलकं असल्यामुळे तुम्ही रताळी कधीही खाऊ शकता. रताळ्यामधील नैसर्गिक साखरेचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही. ज्यामुळे मधुमेहींनीदेखील रताळी खाण्यास काहीच हरकत नाही. सामान्यपणे उपवासाच्या दिवशी रताळी उकडून अथवा रताळ्याचा कीस करून खाल्ला जातो. रताळ्यामध्ये फासबर्स, व्हिटॅमिन  ए, बी 6, सी, डी आणि ई, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन, फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, लोह असतात जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहेत

मुळा
मुळा हे एक आयुर्वेदिक कंदमूळ आहे. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो. त्यामुळे मुळा खाण्याचा लोक कंटाळा करतात. मात्र कच्चा मुळा खाणं आरोग्यासाठी फार गुणकारी असतं. मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, फॉस्फरस, लोह असतं. ज्यामुळे मुळा नियमित खाण्यामुळे युरीनच्या समस्या कमी होतात. ताप आल्यावर मुळा खाण्याने ताप कमी होण्यास मदत होते. मुळ्याची भाजी आणि मुळ्याचं थालीपिठ अथवा पराठा  फारच चविष्ट लागतं. 

गाजर
गाजर हे कंदमूळ केशरी आणि गुलाबी रंगाचं असून ते  आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतं. चवीला गोडसर असल्याने बऱ्याचदा आपण गाजराचा हलवा करतो. मात्र गाजराचा रस आणि सॅलेडदेखील खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. गाजरामधील अ जीवनसत्वामुळे ते डोळ्यांसाठी उपयुक्त असतं. नियमित गाजराचे सेवन केल्यामुळे अनेक आरोग्यसमस्या कमी होऊ शकतात. गाजरातील पोषकघटक तुमच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी फार उपयुक्त ठरतात. 

सुरण
सुरणाचा कंद जमिनीखाली वाढतो. विशेष म्हणजे या कंदमूळाला वर्षातून एकदाच आणि एकच पान येतं. सुरण आरोग्यासाठी फारच गुणकारी असते. सुरणाला देखील खाज येते म्हणून ते व्यवस्थित स्वच्छ करून चिंच अथवा कोकमासोबत शिजवलं जातं. मुळव्याधीचा त्रास असणाऱ्या लोकांनी मुळव्याध अवश्य खावं. सुरणामधील औषधी गुणधर्मामुळे त्याला कंदनायक असंही म्हणतात. सुरणाच्या वड्या, भजी, भाजी काप असे अनेक पदार्थ करता येतात.


कंदमूळ त्याचे फायदे.