बातम्या
पावसाळ्यात हंगामी आजारांपासून रहा सावध
By nisha patil - 7/18/2024 7:40:55 AM
Share This News:
पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप यांसारख्या सामान्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. परंतु काही वेळा हे सामान्य आजार दुर्लक्षामुळे जीवघेणेही ठरतात. अशा वेळी खाण्यापिण्यात आणि दिनचर्येत थोडासा बदल करूनही हंगामी आजार टाळता येतात. याबाबतचे उपाय जाणून घेऊया. (Monsoon Health Tips)
यामुळे होतात हंगामी आजार
हवामानात बदल झाला की शरीराच्या इम्युनिटीवर सर्वाधिक परिणाम होतो. तापमानानुसार विविध प्रकारचे जीवाणू, विषाणू इत्यादी सक्रिय होतात, जे शरीरावर हल्ला करतात. पावसाळ्यात इम्युनिटी कमकुवत असल्यास बॅक्टेरिया सहजपणे शरीर कमकुवत करू लागतात. अशावेळी डॉक्टर अँटी बायोटिक देतात. पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यूचा धोका जास्त असतो.
शरीराचे अंतर्गत आणि बाह्य संरक्षण
* पावसाळ्यात शरीराची इम्युनिटी वाढवणारे पदार्थ सेवन करावे. * शरीराच्या बाह्य सुरक्षेसाठी नेहमी स्वच्छ कपडे घाला. * रोज आंघोळ करा. घरातील आणि आजूबाजूची घाण साफ करा. * घरात नेहमी स्वच्छता ठेवा आणि फिनाईल मॉप लावा. * रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. प्रोटीन आणि फायबर युक्त आहार घ्या. * जास्त तेल किंवा चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळा.
या गोष्टींचा आहारात करा समावेश
इम्युनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी इत्यादींचा
आहारात दररोज समावेश करा. हिरव्या भाज्या आणि फळांचे सेवन करा.
गरम पाण्याची वाफ घ्या. प्रकृती गंभीर असल्यास डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधा.
पावसाळ्यात हंगामी आजारांपासून रहा सावध
|