बातम्या

भीमसेन आयुर्वेदीक कापूर

Bhimsen Ayurvedic Camphor


By nisha patil - 9/4/2024 8:55:39 AM
Share This News:



सर्दी, खोकल्याकरीता एका पातेल्यात गरम पाणी करून मग त्यामध्ये हा कापूर चुरडून टाकावा व वाफारे घ्यावेत.

१) नाकाला, कपाळाला, छातीला ही कापूर लावावा. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
२) रूमालावर कापूर चुरडून तो हूंगावा किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. व्हीक्सची सवय टाळा.
३) पर्यटनाच्या वेळी बर्फाळ स्थानात श्वास लागत असल्यास तो हुंगावा.
४) तीळाच्या तेलातून तो सांध्यांना लावावा. तीळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रीत तेल लावल्यावर कपड्यांना वास येतो त्यामुळे त्याची योग्यतोपरी काळजी घ्यावी.
५) कोंड्याकरीता, सतत सर्दी होत असेल तर त्यांनी तीळाच्या तेलात मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. नाहीतर खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. शक्यतो शनीवारी किंवा रविवारी हा प्रयोग केल्यास उत्तम म्हणजे दुसरे दिवशी न्हाऊन तुम्ही कामावर जायला मोकळे.
६) नेहमीच्या कापरात मेण असते, त्यामुळे हा कापूर शूद्ध असल्यामुळे त्याचा वापर धार्मिक कार्यांत करावा. आरती करताना, गंध उगाळताना त्यात टाकावे, देवाला वीडा देताना कापूरमिश्रीत वीडा देतात तो हाच कापूर, दक्षिण भारतात तीर्थांत वेलची आणि भीमसेन कापूर वापरतात,

श्री बालाजी देवस्थान मधल्या सुप्रसिद्ध लाडवातही ह्याचा उपयोग केला जातो.
७)दाढदुखी करीता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा तो आपोआप विरघळतो व  लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
८) खोकल्याकरीता आयुर्वेदीक कंपनी ह्याच कापराचा उपयोग करतात.

सर्वात शेवटी,

९)संध्याकाळी ह्या कापराचे दोन लहान तुकडे हातामध्ये घेऊन घराची दृष्ट काढावी व घराबाहेर जुन्या पणतीत किंवा एखाद्या जुन्या भांड्यात हा कापूर जाळावा, प्रयोग करायला हरकत नाही, पूर्वी दृष्ट काढयचो तशी दृष्टच काढीत आहोत वास्तूची आपण, कदाचीत योगायोगाने आपले काम होईलही,


भीमसेन आयुर्वेदीक कापूर