बातम्या
रेल्वे स्थानकांवर मोठा बदल! कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच प्रवेश
By nisha patil - 3/27/2025 4:38:07 PM
Share This News:
रेल्वे स्थानकांवर मोठा बदल! कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच प्रवेश
रेल्वे स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील 60 रेल्वे स्थानकांवर केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश मिळणार आहे. वेटिंग लिस्ट आणि विनातिकीट प्रवाशांना स्थानकाबाहेरील प्रतीक्षा कक्षात थांबावे लागेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत यासंदर्भात घोषणा केली. याआधी सूरत, उधणा, पाटणा, नवी दिल्ली येथे ही व्यवस्था यशस्वीपणे राबवली गेली आहे. अनधिकृत प्रवेशद्वार बंद करून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे.
रेल्वे स्थानकांवर मोठा बदल! कन्फर्म तिकीट असलेल्यांनाच प्रवेश
|