बातम्या
एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा – बिघाड झाल्यास पर्यायी बसची सुविधा
By nisha patil - 3/4/2025 5:36:13 PM
Share This News:
एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा – बिघाड झाल्यास पर्यायी बसची सुविधा
त्याच तिकिटावर पुढील प्रवास – उच्च श्रेणीच्या बसमध्येही मुभा
एसटी कर्मचाऱ्यांना सूचना न पाळल्यास कारवाई होणार
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बिघाड झाल्यास किंवा अपघात झाल्यास, प्रवाशांना त्याच तिकिटावर त्याच मार्गावर धावणाऱ्या अन्य एसटी बसने पुढील प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीय. नवीन निर्णयानुसार पुढील बस उच्च श्रेणीची असली तरी प्रवाशांना अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही.
या सुविधेमुळे भर उन्हात ताटकळत थांबण्याची प्रवाशांची गरज राहणार नाही. एसटी बिघाड झाल्यास, त्या मार्गावर धावणाऱ्या बसना त्वरित सूचना दिली जाते आणि शक्य असल्यास जवळच्या आगारातून पर्यायी बस उपलब्ध करून दिली जाईल. मात्र, एसटी बंद पडल्यास प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही. जिथे पर्यंतचे तिकीट आहे तिथे पर्यंत प्रवास करता येईल.
जर पर्यायी बस वेळेवर उपलब्ध करून दिली गेली नाही, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, चालक आणि वाहक बिघाड झाल्याची त्वरित माहिती विभागीय कार्यालयाला देतात, ज्यामुळे मार्गावर धावणाऱ्या अन्य बसच्या चालकांना सूचना देता येते. त्यामुळे प्रवाशांना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करता येणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे यांनी दिली.
एसटी प्रवाशांसाठी मोठा दिलासा – बिघाड झाल्यास पर्यायी बसची सुविधा
|