बातम्या

रक्‍तगट आणि आहार नियोजन

Blood group and diet planning


By nisha patil - 12/8/2024 7:30:45 AM
Share This News:



अनेकदा आपण डाएट चार्टविषयी ऐकतो, बोलतो. कधी कधी डाएट चार्टनुसार आहारही घेत असतो. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये डाएटचे फॅड वाढतानाही पाहायला मिळत आहे; मात्र कधी असं ऐकलेलं नसेल की, आपला डाएट प्लॅन (आहार नियोजन) हा आपल्या ब्लड ग्रुपप्रमाणे (रक्‍तगट) असेल; मात्र अनेक आहारतज्ज्ञांच्या अभ्यासातून समोर आले आहे की, आपल्या ब्लड ग्रुपनुसार आपला आहार ठेवल्यास शरीरास आवश्यक असणारे प्रोटिन योग्य प्रमाणात मिळते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार काही गोष्टींचा शरीरास फायदा किंवा तोटा हा ब्लड ग्रुपच्या माध्यमातूनच होत असतो. त्यामुळे आपल्या ब्लड ग्रुपनुसार डाएट चार्ट बनवल्यास त्याचा शरीरास चांगला फायदा होऊ शकतो.

व्यायाम ः  ब्लड ग्रुपनुसार डाएट चार्ट बनवताना याही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे की, कोणत्या गोष्टी खाणे आवश्यक आहे आणि कोणत्या अनावश्यक आहेत. कोणत्या गोष्टी शरीरास जास्त प्रमाणात फायदेशीर आणि नुकसानकारक आहेत. यानुसार डाएट चार्ट तयार करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच ती व्यक्‍ती किती प्रमाणात व्यायाम आणि शारीरिक हालचाली करते, यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत.

ए ब्लड ग्रुप ः या ब्लड ग्रुपच्या व्यक्‍तींनी शाकाहारी जेवण म्हणजेच हिरव्या भाज्या, ड्राय फ्रुट्स आणि मोड आलेली कडधान्ये या प्रकारचा आहार घेणे आवश्यक आहे.

बी ब्लड ग्रुप ः या रक्‍तगटातील व्यक्‍ती कोणत्याही प्रकारचा आहार संतुलित प्रमाणात घेऊ शकतात. या रक्‍तगटातील व्यक्‍तींनी बंद पॅकेटमधील पदार्थ कमी प्रमाणात घेणे गरजेचे आहे.

ओ ब्लड ग्रुप ः या रक्‍तगटातील व्यक्‍तींच्या आहारामध्ये प्रोटिनचे प्रमाण संतुलित असणे आवश्यक आहे. तसेच या रक्‍तगटातील लोकांनी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यांचा आहारातील समावेश कमी करावा.

एबी ब्लड ग्रुप ः  या रक्‍तगाटातील लोकांनी मिश्र आहार जास्त प्रमाणात घ्यावा. त्याबरोबरच प्रोटिनचे आहारातील प्रमाण वाढवणेही आवश्यक आहे.

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ब्लड ग्रुपनुसार डाएट चार्ट तयार करत असताना, काही  गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. उदा. - वय, वजन, कामाचा प्रकार, हिमोग्लोबीनचे प्रमाण, डाएट चार्ट बनवण्याचा उद्देश काय, आजार किंवा ब्लडसंबंधीची एखादी समस्या या गोष्टींचा विचार करून डाएट चार्ट बनवणे आवश्यक आहे.


रक्‍तगट आणि आहार नियोजन