बातम्या

कणेरीवाडीत 35 लाखांचे बोगस काम, आरपीआयचा आंदोलनाचा इशारा

Bogus work worth Rs 35 lakhs in Kaneriwadi


By nisha patil - 3/4/2025 5:35:12 PM
Share This News:



कणेरीवाडीत 35 लाखांचे बोगस काम, आरपीआयचा आंदोलनाचा इशारा

प्रत्यक्ष कामे नाही, तरीही ठेकेदारांनी उचलले लाखो रुपये

ग्रामसेवक आणि अभियंत्यांवर चौकशीचा प्रस्ताव तयार

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील कणेरीवाडीत सुमारे 35 लाख रुपयांचे काम न करताच पैसे उचलल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाने केलाय. जिल्हा परिषदेने अद्याप कारवाई केली नाही, यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना निवेदन दिले. आठ दिवसांत संबंधितांवर कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
 

2017 ते 2022 दरम्यान चौदावा वित्त आयोग आणि दलित वस्ती सुधार योजनेतून सहा कामे मंजूर झाली होती. मात्र, या ठिकाणी प्रत्यक्ष कामे झालीच नसल्याचे उघड झाले. दोन ग्रामसेवक आणि करवीर पंचायत समितीचे शाखा अभियंता दोषी ठरले असून त्यांच्या चौकशीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या वस्त्या अस्तित्वात नाहीत, अशा ठिकाणी रस्ते दाखवून निधी उचलण्यात आल्याचा आरोप आहे.


कणेरीवाडीत 35 लाखांचे बोगस काम, आरपीआयचा आंदोलनाचा इशारा
Total Views: 19