बातम्या

"शिक्षण क्षेत्रातील उज्वल कामगिरी – के. डी. पाटील सरांना 'बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड'!"

Brilliant performance in the field of education


By nisha patil - 3/24/2025 4:57:09 PM
Share This News:



"शिक्षण क्षेत्रातील उज्वल कामगिरी – के. डी. पाटील सरांना 'बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड'!"


"किरण बेदी आणि सायना नेहवाल यांच्या हस्ते के. डी. पाटील सरांचा विशेष सन्मान!"

 INDIAN TALENT OLYMPIAD तर्फे आयोजित Best Principal Award - Felicitation Event 2024-25 मध्ये अंबूबाई  पाटील स्कूलचे प्राचार्य के. डी. पाटील सरांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिलेल्या उच्च शिक्षणाच्या संधी, दर्जेदार मार्गदर्शन आणि शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या भव्य सोहळ्याला भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी आणि माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी आणि ऑलिम्पिक पदक विजेती, पद्मभूषण पुरस्कारप्राप्त बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते के. डी. पाटील सरांना सन्मानित करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळाली आहे. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याची देशभरात दखल घेतली जात असून, अंबूबाई  पाटील स्कूल आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.


"शिक्षण क्षेत्रातील उज्वल कामगिरी – के. डी. पाटील सरांना 'बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड'!"
Total Views: 8