बातम्या

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘सीएमडी लीडरशिप’ पुरस्कार

CMD Leadership Award to Lokesh Chandra


By nisha patil - 2/15/2025 7:49:23 PM
Share This News:



महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘सीएमडी लीडरशिप’ पुरस्कार

मुंबई, १५ फेब्रुवारी २०२५ – महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना ‘सीएमडी लीडरशिप’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गव्हर्नन्स नाऊ नियतकालिकाच्या ‘वेस्टेक सिम्पोसियम अँड ॲवॉर्ड २०२५’ सोहळ्यात त्यांना देशभरातील ऊर्जा कंपन्यांमधून सर्वोत्तम अध्यक्ष म्हणून गौरविण्यात आले.

महावितरणला सायबर सुरक्षितता, नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार आणि कौशल्य विकासासाठी विशेष पुरस्कार मिळाले. सत्कारप्रसंगी लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे श्रेय मानले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचा उपक्रम सुरू असून, तो मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे कृषी क्षेत्रासाठी सौर ऊर्जेचा व्यापक वापर वाढेल आणि उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होईल. महाराष्ट्र हे उद्योगांवरील क्रॉस सबसिडी हटविणारे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘सीएमडी लीडरशिप’ पुरस्कार
Total Views: 33