बातम्या

कँल्शियम ची कमतरता

Calcium deficiency


By nisha patil - 3/8/2024 8:15:22 AM
Share This News:



आपल्या शरीरात रस, रक्त, मांस, मेद ,अस्थी ,मज्जा व शुक्र हे सात धातू असतात. हे शरीराचे धारण करतात म्हणून यांना धातू असे म्हणतात. या सात धातू पैकी अस्थिधातूमुळे आपल्या शरीराला आकार प्राप्त होतो.या अस्थिधातूमध्ये कॅल्शियम हा महत्त्वाचा घटक असतो .कॅल्शियम मुळे शरीरातील जैविक घटकांचे संतुलन कायम राहते .आपल्या आहारातून मिळणाऱ्या कॅल्शियम मुळे रक्तामधील कॅल्शियमचे प्रमाण योग्य राहते .कॅल्शियम मुळे पेशीचे आरोग्य उत्तम राहते .स्नायूंच्या बदलामुळे शरीरातील हाडांच्या संरचनेमध्ये बदल होत असल्याने कॅल्शियमची गरज जास्त प्रमाणात असते .

शरीरातील मणके, अस्थी यामध्ये शक्ती टिकून राहण्यासाठी तसेच स्नायू व हृदयाचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरातील रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत देखील कॅल्शियमचे महत्त्व खूपच असते .कॅल्शियम हा दात व अस्थि यामधील मूलभूत घटक असल्याने शरीरातील पेशींच्या कार्यांबरोबर पेशींचे विभाजन, रक्तसंचलन ,हाडाचे आकुंचन व प्रसारण यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. शरीरातील कॅल्शियम हे विटामिन डी. थायराइड ,हार्मोन्स आणि कॅल्सीटोनील याद्वारे नियंत्रित केले जाते.

त्यामुळे शरीरातील व रक्ताची कॅल्शियमचे प्रमाण नेहमी योग्य राहते विटामिन डी आतड्यातील व किडनीतील कॅल्शियम रक्तामध्ये शोषून घेण्यासाठी मदत करते. आपल्या शरीराला विटामिन डी ही कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळत असते .विटामिन डी च्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. याशिवाय आहारातून कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन न करणे, पचनशक्ती मंदावणे यामुळे आहारातील कॅल्शियमची शोषण कमी होते तसेच स्त्रियांना मासिक पाळीत अतिरिक्त स्त्राव होणे, स्त्रियांची मासिक पाळी येणे बंद झाल्यानंतर हार्मोनचे संतुलन बिघडणे व ऊन आणि शारीरिक श्रमांचा अभाव, गोड पदार्थांची अति सेवन करणे ,नवजात बालकांना मातेचे दूध न मिळणे यामुळे देखील कॅल्शियमची कमतरता निर्माण होते .प्रत्येक स्त्रीमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर शरीरातील हार्मोन्सची संतुलन बिघडल्याने संपूर्ण शरीरातील हाडे ठिसूळ लागतात. या दिवसांमध्ये फक्त आहारातून कॅल्शियम घेऊन पूर्तता शकत नाही त्यासाठी आयुर्वेदिक कॅल्शियमची औषधे घेणे गरजेचे असते अन्यथा स्त्रियांच्या शरीरातील हाडे ठिसूळ होऊन थोडाश्या आघाताने देखील भग्न होऊ शकतात .
अनेक स्त्रियांना हाता पायांना मुंग्या येणे, मणक्याचे  विकार उद्भवणे,मान व कंबर दुखणे, सकाळी उठताना त्रास होणे, चालताना त्रास होणे ,मांडी घालून जास्त वेळ बसू न शकणे. शौचाला बसता न येणे ,चक्कर येणे, गुडघेदुखी ,लवकर थकवा येणे ,दात दुखणे, नखे ठिसूळ झाल्याने तुटणे, केस गळणे, सतत भीती वाटणे, ताण तणाव जाणवणे ,स्मरणशक्ती कमी होणे व झोप न लागणे अशा अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागते तथापि बहुतांश स्त्रियां त्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्याचे दुष्परिणाम  भोगावे लागतात .


कँल्शियम ची कमतरता