बातम्या

कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय

Calcium deficiency symptoms and home remedies


By nisha patil - 6/21/2024 12:43:34 AM
Share This News:



कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय

▪️ नखे पांढरट होणे. किंवा त्यावर तसे ठिपके दिसणे.

▪️हाताला  मुंग्या येणे.

▪️हाडातील ठिसूळपणा.

▪️सांधेदुखी  हातांची हाडे, पाय, मांडी दुखणे.

▪️ थकवा येणे, कमी झोप.

▪️ स्मृतिभ्रंश 🤔

▪️कोरडी त्वचा, खाज येणे.

▪️ दात दुरखी, दात किडणे, त्यांची मुळे सैल होणे.

▪️मासिक पाळीवेळी ओटीपोटात दुखणे,

▪️निराशा.. 

▪️अनामिक भीती.

▪️हाडांची झीज होणे, गुड़ते दुखणे

कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी घरगुती उपाय

दूध - दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तीसुद्धा पर्याप्त प्रमाणात कॅल्शियम प्राप्त करू शकतात. दुधाच्या माध्यमातून शरीरात  जाणारे कॅल्शियम जास्त फायदेशीर असते.

दही - दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये ४०० मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ उदा. पनीर, चीज सेवन करून कॅल्शियम मिळते.

मसाले-तुळस - ओव्याची फुले, दालचिनी, पुदिना, लसुण तसेच तुळस यासारखे मसाले न केवळ पदार्थांना विशेष प्रकारचा फ्लेवर आणि टेस्ट देतात, यातून कॅल्शिअम मिळते.

पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, मशरूम सलाड

शेंगभाज्या - शेंगभाज्या 🫘शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते

संत्री-लिंबू - संत्री, लिंबू  यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

सोयाबीन - सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम  स्रोत आहे.


कॅल्शियम कमी होण्याची लक्षणे व घरगुती उपाय