बातम्या

मूळव्याध आणि हृदयरोगावरही गुणकारी आहे ‘गाजर’

Carrot is also effective against hemorrhoids and heart disease


By nisha patil - 8/13/2024 9:30:48 AM
Share This News:



गाजरामध्ये बीटा कॅरोटिन भरपूर मात्रेत असल्याने गाजर खाल्ल्यानंतर ते पोटात जाऊन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरीत होते. गाजरामधील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी लाभदायक ठरते. गाजरात असलेल्या गुणांची बरोबरी कुठलीही अन्य भाजी करू शकत नाही. गाजराचा वापर सलाड, भाजी किंवा शिरा यामध्ये करता येऊ शकतो. गाजराचे ज्यूससुद्धा शरीरासाठी लाभदायक आहे. मूळव्याध आणि हृदयरोगावर गाजर खूपच गुणकारी आहे.

गाजर थंड प्रवृत्तीचे असले तरी ते कफनाशक असल्याचे तज्ज्ञ सांगातात. लवंग व आल्याप्रमाणे गाजर हे छाती व गळ्यात जमलेल्या कफाला बाहेर काढू शकते. गाजरात काही अशा प्रकारचे लोहतत्व असतात जे कमजोरी दूर करून शरीरातील प्रत्येक तंतू व ग्रंथीला निरोगी ठेवतात. आयुर्वेदानुसार गाजर हे एक फळ किंवा भाजी नसून रक्तपित्त तथा कफ नष्ट करणारे गोड, रसदार, पोटातील अग्नीला वाढवणारी व पाईल्स सारख्या रोगांवर उत्तम जटीबुटी मानले जाते. गाजर हृदय रोगांवर रामबाण औषधी आहे. याने वीर्य विकार नष्ट होतो आणि शारीरिक थकवाही दूर होतो. गाजरात रक्त अवरोधक शक्ती असल्याने ते रक्तपित्त तयार होऊ देत नाही.


मूळव्याध आणि हृदयरोगावरही गुणकारी आहे ‘गाजर’