बातम्या

दोनशे झाडांचे रोपणाने तरुणाईचा फ्रेंडशिप डे साजरा

Celebrating Youth Friendship Day by planting 200 trees


By nisha patil - 5/8/2024 7:31:13 AM
Share This News:



दोनशे झाडांचे रोपणाने तरुणाईचा फ्रेंडशिप डे साजरा

फ्रेंडशिप डे म्हणजे मित्र मैत्रिनी  बरोबर कॅफे, मूव्ही, पब मध्ये जावून भरमसाठ पैसे  खर्च करायचे असा आजच्या तरुणाईचा ठरलेला रीवाज. पण याला अपवाद ठरले आहेत कोल्हापूर ड्रीम टीम फाउंडेशनचे सदस्य. मैत्री दिनाचे औचित्य साधून ड्रीम टीमने आजचे दिवशी "चला करूया झाडाशी मैत्री" असे आव्हान तरुणाईला सोशल मीडियावर केले होते. त्या आव्हानास कोल्हापूरच्या तरुणाईने उस्फूर्त प्रतिसाद देत जरगनगर येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास मोठे प्रमाणात उपस्थिती लावली. सुमारे १६० तरुण व आबाल वृद्ध या मध्ये सहभागी झाले होते.  या उपक्रमा अंतर्गत वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शना खाली दोनशे जंगली झाडांचे रोपण जरगनगर येथील माळावर  करण्यात आले. या उपक्रमास अमोल बुध्ढे,अमित पाटील, नामदेव पाडळकर, कांबळे सर, सविता साळोखे, राहुल चिकोडे, सुहास वाईगंनकर यांचे मारगदर्शन लाभले. उपक्रमाचे आयोजन डॉ. प्रमोद चौगुले, श्रुती चौगुले,अर्पिता राऊत,  श्रेया चौगुले, आँचल कटारिया, श्रावणी पाटील, सुप्रिया चौगुले, वंदना पाटील, शैलजा राऊत यांनी केले.


दोनशे झाडांचे रोपणाने तरुणाईचा फ्रेंडशिप डे साजरा