बातम्या
छत्तीसगडमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याचा निर्णय
By nisha patil - 4/4/2025 10:57:48 PM
Share This News:
छत्तीसगडमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याचा निर्णय
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी लव्ह जिहाद आणि बळजबरीच्या धर्मांतराविरोधात येत्या अधिवेशनात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. हिंदू जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री म्हणाले की, "भारतामधील सर्वांत प्रभावी कायदा आम्ही छत्तीसगडमध्ये आणणार आहोत."
हलाल सर्टिफिकेशन आणि घुसखोरीविरोधातही सरकारची कडक भूमिका
राज्यातील हलाल सर्टिफिकेशन हे आर्थिक षडयंत्र असून त्यावर लवकरच ठोस कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरीवरही कडक पावले उचलली जात असून आतापर्यंत ८०० जणांची चौकशी करण्यात आली आहे.
बैठकीला हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती
या बैठकीस हिंदू जनजागृती समितीचे श्री सुनील घनवट, श्री हेमंत कानसकर, श्री मंगेश खंगन, श्री निरज क्षीरसागर, तसेच इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीदरम्यान हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी निर्णायक पावले उचलण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.
छत्तीसगडमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कठोर कायदा करण्याचा निर्णय
|