बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवे व देशपांडे गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण...
By nisha patil - 7/3/2025 3:09:57 PM
Share This News:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवे व देशपांडे गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण...
मुख्यमंत्र्यांनी घेतले जगद्गुरु दत्त चिले महाराजांचे दर्शन
पैजारवाडी (ता. पन्हाळा) येथे शिक्षणमहर्षी पांडुरंग हिरवे गुरुजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर व आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. हिरवे गुरुजींच्या कार्याची आठवण म्हणून हे स्मारक उभारण्यात आले असून, ग्रामस्थांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पैजारवाडी येथील जगद्गुरु दत्त चिले महाराज मंदिरात दर्शन घेतले. कार्यक्रमास जिल्ह्यातील मान्यवर, आमदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवे व देशपांडे गुरुजींच्या पुतळ्याचे अनावरण...
|