बातम्या

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर  ;  जिल्हाधिकारी अमोल येडगे

Chief Minister Solar Agricultural Channel Scheme is beneficial for farmers


By nisha patil - 3/15/2025 3:04:04 PM
Share This News:



मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर  ;  जिल्हाधिकारी अमोल येडगे

प्रकल्पातून १,१०० शेतकऱ्यांना फायदा

सौर प्रकल्पांची गुणवत्ता व जलद गतीने पूर्णता आदेश

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे, कारण यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळाल्याने त्यांचे जीवन सुखकर होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. ते हरळी बुद्रुक, तालुका गडहिंग्लज येथील तीन मेगा वॅट सौर प्रकल्पाच्या कार्यान्वयन कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पातून ११०१ शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार आहे, ज्यामुळे त्यांना शेती करतांना मोठा फायदा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी दिली. 

येडगे यांनी उर्वरित सर्व सौर प्रकल्प गुणवत्ता आणि जलद गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. कार्यक्रमास प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय आडके, उपकार्यकारी अभियंता नागेश बसरकट्टी, सहाय्यक अभियंता संदीप पाटील, तहसीलदार ऋषिकेश शेळके, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह जनमित्र आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर  ;  जिल्हाधिकारी अमोल येडगे
Total Views: 20