बातम्या

थंड की गरम, केस धुण्यासाठी कोणते पाणी योग्य?

Cold or hot which water is best for washing hair


By nisha patil - 2/9/2024 7:32:24 AM
Share This News:



तेलकट केस
तेलकट केस रोज धुणे सुरक्षित आहे, त्यामुळे तुमच्या टाळूवरील बुरशीजन्य त्वचासंसर्ग कमी करतो. तसेच केसांमधील कोंडा कमी करतो पण जेव्हा तुम्ही तेलकट केस धुता तेव्हा पीएच बॅलन्स करणारा शॅम्पू व केसांच्या टोकांना कंडिशनर वापरणे अत्यंत आवश्यक आहे.
शुष्क किंवा कोरडे केस 
काही लोकांचे केस जन्मत:च कोरडे असतात तर काही लोकांचे केस रंगविल्यामुळे किंवा स्ट्रेटनिंग करण्यामुळे खराब होतात. कोरडे केस सल्फेट फ्री शॅम्पूने आठवड्यातून दोनदा धुतले पाहिजे. हा शॅम्पू केसांच्या नैसर्गिक तेलाचे संरक्षण करतो आणि केस आणखी कोरडे होणे टाळतो. केसांना शॅम्पू केल्यानंतर प्रत्येक वेळी हेअर मास्क वापरा, जो केसांना नैसर्गिक तेल पुरवितो आणि केसांना पोषण करण्यासाठी त्यांचा अर्क मागे सोडतो.

 

कुरळे केस 
कुरळ्या केसांना सुळसुळीत आणि हायड्रेट ठेवण्यासाठी खूप जास्त काळजी घ्यावी लागते. कुरळ्या केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास केसांचा खूप गुंता होऊ शकतो आणि दिवसभर त्यांना सांभळणे कठीण होऊ शकते. कुरळ्या केसांना सौम्य सल्फेट फ्री शॅम्पूने आणि चांगला हायड्रेटिंग कंडिशनर वापरून आठवड्यातून दोन-तीन वेळा धुतले पाहिजे. कुरळ्या केसांना खूप ओलावा पुरविण्याची गरज असते. को-वॉशिंग ही कुरळे केस असलेल्यांनी आत्मसात केलेली अत्यंत चांगली पद्धत आहे. को-वॉशिंग ही पद्धत तेव्हा वापरली जाते जेव्हा तुम्हाला आठवड्याच्या मध्यंतरी कुरळे केस धुण्याची गरज असते पण शॅम्पू वापरून तुम्हाला केस कोरडे करायचे नसतात. को-वॉशिंग म्हणजे केस धुण्यासाठी तुमच्या हेअर कंडिशनरचा वापर करणे. ही पद्धत त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्याने त्यांचे कुरळे केस दररोज न धुता ओले आणि सुळसुळीत ठेवायचे आहेत. कुरळे केस धुतल्यानंतर आणि कंडिशनर वापरल्यानंतर त्यांना शिया बटर आणि कोकोआ बटरने समृद्ध असलेले curl cream किंवा a leave-in conditioner वापरण आवश्यक आहे.

केस धुतल्यानंतर केली जाणारी सर्वात मोठी चूक कोणती?
केस धुतल्यानंतर ओल्या केसांना साध्या ब्रशने किंवा लहान दातांच्या कंगव्याने विंचरणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते, कारण असे केल्यामुळे तुमचे ओले केस तुटू शकतात. केस तुटू नयेत यासाठी मोठ्या दातांचा कंगवा किंवा लवचीक दात असलेला गुंता सोडविणारा ब्रश वापरण्याचा सल्ला दिला जातो. हेअर मास्क लावल्यानंतर केस धुतांना गुंता सोडविण्यासाठी आणि कंडिशनर सर्वत्र व्यवस्थित लावण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. जाड केसांसाठी हा कंगवा उत्तम प्रकारे काम करतो.

केस धुताना काय करावे आणि काय करू नये?
काय करावे: आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा केस धुवावेत.
काय करू नये: केसांसाठी कठोर शॅम्पू आणि कंडिशनर वापरू नये.
काय करावे: केस धुण्याआधी विंचरावेत.
काय करू नये: ओले केस बांधू नये.
काय करावे: शॅम्पू लावल्यानंतर ताबडतोब धुऊन टाका ( अपवाद: फक्त अँटी डँड्रफ शॅम्पू एक मिनिट केसांना लावून ठेवावा)
काय करू नये: केस धुताना तुमच्या टाळूला नखांनी ओरखडू नका
काय करावे: टाळूसाठी दातेरी स्कॅल्प स्क्रॅबल वापरा
काय करू नका : ओले केस टॉवेलने जोरात पूसू नका
काय करावे: केसांना सुकविण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता.
काय करू नये: केसांसाठी अतिप्रमाणात शॅम्पू वापरू नका.


थंड की गरम, केस धुण्यासाठी कोणते पाणी योग्य?