बातम्या
बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
By nisha patil - 2/19/2025 11:05:18 AM
Share This News:
बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
कोल्हापूर, दि. 18 – जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी आणि परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एसओपी तयार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. क्रिडाई कोल्हापूरसोबत झालेल्या बैठकीत दस्त नोंदणी, बिगर शेती आदेश, फेरफार नोंदणी यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
परवानग्यांसाठी डिजिटल प्रणालीचा अवलंब, निश्चित वेळमर्यादा आणि ट्रॅकिंग प्रणाली लागू करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच, दस्त नोंदणी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. यामुळे परवानग्यांची प्रक्रिया जलद व सुलभ होईल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
|