बातम्या
कसबा बावड्याच्या विकासासाठी कटिबद्ध – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 3/17/2025 4:52:44 PM
Share This News:
कसबा बावड्याच्या विकासासाठी कटिबद्ध – आमदार राजेश क्षीरसागर
कोट्यवधींचा निधी मंजूर; विकासकामांचे उद्घाटन संपन्न
कोल्हापूर: कसबा बावड्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून विविध विकासकामे हाती घेतली आहेत, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितले.
राजाराम बंधाऱ्याचा पर्यायी पूल, बावड्यातील प्रमुख रस्ते, सुशोभिकरण प्रकल्प, तिरंगा लाईट आदी कामांसाठी मोठा निधी मिळवून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातही कसबा बावड्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कसबा बावड्याच्या विकासासाठी कटिबद्ध – आमदार राजेश क्षीरसागर
|