बातम्या
सतत चिडचिड होते, बारीक-सारीक गोष्टींचा राग येतो; मग ही योगासनं करा
By nisha patil - 6/28/2024 6:40:28 AM
Share This News:
निरोगी राहाण्यासाठी योग साधनेचं महत्व अनन्यसाधारण आहे. आजार दूर ठेवण्यासाठी आणि झालेले आजार बरे करण्यासाठी योगसाधना अवश्य करण्याचा सल्ला दिला जातो. योगसाधनेत विविध आसनांचा समावेश आहे.
दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला असंख्य गोष्टींना सामोरं जावं लागतं. सतत चिडचिड, स्ट्रेस येणं नको त्या गोष्टींचा अतिविचार करणं हे सारं कोणालाही चुकलेलं नाही.ऑफिसमधील कामाचा प्रेशर, आर्थिक अस्थिरता तसेच अपेक्षांचं ओझं ही मानसिक तणावाची प्रमुख कारणं आहेत. तणामुळे अनिद्रा, डिप्रेशन यांसारख्या समस्यांच्या गर्तेत माणूस सापडतो.अशातच नियमितपणे योग आणि प्राणायाम केल्याने मानसिक स्वास्थ सुधारते.
ताडासन...
ताडासन हा योग प्रकार 'माउंटन पोज' या नावाने देखील ओळखला जातो. हा एक सरळ योग प्रकार आहे. मानसिक ताण-तणाव कमी करण्यास ताडासन करणं प्रभावी मानलं जातं.
ताडासन करण्याची पद्धत...
*१) सुरुवातीला ताडासन करण्यासाठी जमिनीवर सरळ उभं राहावं.
*२) त्यानंतर आपल्या दोन्ही पायाचे पंजे आणि टाचा एकमेकांना चिटकवून उभं राहा.
*३) त्यानंतर हात एकत्र जोडून शरीर वरच्या बाजूला खेचा. ५ ते ८ वेळा दीर्घ श्वास घ्या. नंतर सामान्य स्थितीत या.
वृक्षासन...
मानवी शरीराचे संतुलन राखण्याकरिता शिवाय मेंदुची एकाग्रता क्षमता वाढविण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरतं. त्यामुळे नियमितपणे वृक्षासन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.
वृक्षासन करण्याची पद्धत...
*१) सुरुवातीला वृक्षासन करण्यासाठी आपले दोन्ही पाय सरळ पोजिशनमध्ये ठेवा. त्यानंतर व्यवस्थित दोन्ही पायांवर ताठ उभे राहा.
*२) असं केल्यानंतर तुमचा उजवा पाय उचलून त्याला गुडघ्यातून वाकवा. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या जांघेजवळ लावा आणि तशीच अवस्था कायम ठेवा.
*३) या आसनामध्ये संपूर्ण शरीराचा तोल सांभाळून ठेवणं हा तुमच्यासाठी मोठा टास्क आहे.
*४) शरीराचा तोल सावरल्यानंतर तुमचे दोन्ही हात सरळ डोक्यावर घ्या आणि त्यानंतर हातांचे तळवे एकमेकांवर जोडून नमस्कार करण्याची पोझ घ्या.
सर्वांगासन...
सर्वांगासन करताना शरीराच्या सर्व अंगांचा समावेश होतो. तसेच या आसनामुळे शरीराच्या जवळ जवळ सर्व अवयवांना फायदा होतो म्हणून हे सर्वांगासन.
मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी सर्वांगासन हे उत्तम व्यायाम आहे. सर्वांगासानचा फायदा थायराॅइड ग्रंथींचं काम उत्तम होण्यास होतो. यातून तणाव कमी करनारं एंडोर्फिन नावाचं हार्मोन स्त्रवतं. मनात सतत नकारात्मक विचार येणे, मेंद आणि शरीराला सतत थकवा येणं, सकाळी उठल्या उठल्या आळस वाटणं या समस्यांमध्ये सर्वांगासन करणं फायदेशीर ठरतं.
सर्वांगासन कसं करावं...?
*१) सर्वांगासन करतोवेळी पहिल्यांदा जमिनीवर ताठ झोपावं.
*२) त्यानंतर आपले दोन्ही हात शरीराच्या बाजूला, जमिनीला टेकलेले असावेत.
*३) पुढे दीर्घ श्वास घेत दोन्ही पाय आणि कंबर वर उचलावी. शिवाय दोन्ही हातांनी पाठीला आधार द्यावा. पाय वरच्या दिशेनं सरळ ठेवावेत. सर्वात महत्वाचं म्हणजे शरीराच सर्व भार खांद्यांवर असावा.
*४) सर्वांगासन करताना आपले खांदे, डोकं आणि पाय एका सरळ रेषेत असतात. या अवस्थेत मंद स्वरुपात श्वसन सुरु ठेवावं. जेवढी क्षमता आहे तेवढा वेळ या आसनात राहावं.
*५) सुरुवातीला सामान्यत: अर्धा ते एक मिनिट या आसनात राहाता येतं. आसन सोडताना पाय एकदम जमिनीला टेकवू नये. आधी पाठ आणि कंबर जमिनीला टेकवावी आणि मग पाय हळूवार जमिनीला टेकवावेत.
सतत चिडचिड होते, बारीक-सारीक गोष्टींचा राग येतो; मग ही योगासनं करा
|