बातम्या

तीन एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू

Curfew in effect until April 3


By nisha patil - 3/22/2025 1:11:54 PM
Share This News:



तीन एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटनांकडून आंदोलन, उपोषण, मोर्चा काढले जातात. यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

म्हणून शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते ३ एप्रिल रोजी रात्री बारापर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी यासंबंधीचा आदेश काढलाय.


तीन एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू
Total Views: 18