बातम्या

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधनाला पेटंट 

D Y Patil approves patent for university research


By nisha patil - 3/19/2025 9:59:56 PM
Share This News:



डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधनाला पेटंट 
 

कोल्हापूर – डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी ऊर्जा साठवणुकीसाठी विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. “ए मेथड सिंथेसायझिंग ऑफ रेड्यूस्ड ग्राफीन ऑक्साइड निकेल कोबाल्ट ऑक्साइड कॉम्पोझिट कोटिंग ऑन सॉलिड सरफेस फॉर एनर्जी स्टोरेज अप्लिकेशन” या नावाने सादर केलेल्या तंत्रज्ञानाला रोजी पेटंट मंजूर झाले.

प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित ही नवीन प्रक्रिया ऊर्जा साठवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सुपरकॅपेसिटर आणि बॅटरीसाठी प्रभावी आणि कार्यक्षम 'थिन फिल्म्स' विकसित करण्यासाठी वापरली जाईल. ही पद्धत रासायनिक प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आली असून, ती तुलनेने अधिक सोपी आणि कमी खर्चिक आहे. हे पेटंट पुढील २० वर्षांसाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे संरक्षित राहणार आहे. 

प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यापीठाला मिळालेले हे ४८ वे पेटंट आहे. संशोधन कार्यात संशोधक विद्यार्थी ज्योती थोरात, अजिंक्य बगडे, दिव्या पवार, डॉ. संभाजी खोत आणि डॉ. वैभव लोखंडे यांचा सहभाग होता. या यशस्वी संशोधनासाठी संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे


डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधनाला पेटंट 
Total Views: 19