बातम्या

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे 'बायोमेक' आंतरराष्ट्रीय परिषदेत यश

D Ych International Conference

By nisha patil - 7/2/2025 7:35:21 PM
Share This News:

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे 'बायोमेक' आंतरराष्ट्रीय परिषदेत यश

कराड: कृष्णा विश्व विद्यालय येथे झालेल्या "बायोमेक इन इंडिया - २" आंतरराष्ट्रीय परिषदेत डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी रिसर्चच्या पीएचडी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.

पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये सोहेल बाबूलाल शेख यांनी प्रथम क्रमांक, तर प्रणोती अनिल कांबळे यांनी मॉडेल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच, सुस्मिता सतीश पाटील आणि राधिका बाबासाहेब जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे 'बायोमेक' आंतरराष्ट्रीय परिषदेत यश
Total Views: 27