बातम्या
प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी.
By nisha patil - 3/26/2025 8:52:09 PM
Share This News:
प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी.
इंद्रजीत सावंत यांचे पोलिसांना पत्र
महापुरुषांचा अवमान करणाऱ्या शिवद्रोही प्रशांत कोरटकर याला ज्या पोलीस कोठडीमध्ये ठेवले आहे त्या कोठडीतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत व हर्षल सुर्वे यांनी केली आहे. या संदर्भातील पत्र जुना राजवाडा पोलिसांना त्यांनी दिले.
प्रशांत कोरटकरला याचे व्हीआयपी लोकांशी संबंध आहेत म्हणून त्याला VIP ट्रीटमेंट मिळू नये यासाठी ही मागणी करण्यात आलीय.तेलंगणातून अटक केल्यानंतर काल कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केलं होतं.न्यायालयाने त्याला २८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीतील सीसीटीव्ही फुटेजची मागणी.
|