विशेष बातम्या
सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षणाची मागणी
By nisha patil - 4/4/2025 10:56:26 PM
Share This News:
सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षणाची मागणी
खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांची भेट घेऊन सहकारी पतसंस्थांच्या समस्या व मागण्यांबाबत चर्चा केली. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. पतसंस्थांमधील पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण मिळावं, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
तसेच पतसंस्थांना गुगल पे, फोन पेसारखे डिजीटल व्यवहार करण्याची परवानगी, आयकर नोटीसांचा त्रास टाळणं, आणि टीडीएससंदर्भातील अडचणी दूर करणं यावरही चर्चा झाली. केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले.
सहकारी पतसंस्थांच्या ठेवींना विमा संरक्षणाची मागणी
|