बातम्या
शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By nisha patil - 3/18/2025 5:52:03 PM
Share This News:
शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
कडगाव (ता. गडहिंग्लज) – कडगाव वनक्षेत्रातील वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असून, यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण यांना निवेदनाद्वारे केली.
वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांनी लाकूडतोड केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाते, मात्र वन्यप्राणी शेतात घुसून पीक उद्ध्वस्त करत असताना त्याचा बंदोबस्त का केला जात नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सत्यजितराव जाधव, यशवंत (बाबा) नांदेकर, शशिकांत पाटील, मानसिंग पाटील, प्रकाश डेळेकर, बाळासाहेब भालेकर, दशरथ पाटील, धनाजी गुळंबे, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
|