बातम्या

उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा

Deputy Chief Minister Ajit Pawars district tour


By nisha patil - 3/27/2025 4:32:30 PM
Share This News:



उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दिनांक 27 मार्च 2025 रोजी सकाळी  11.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी 11.45 ते 1 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात चर्चेसाठी राखीव. नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 1.15 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.

नंतर मोटारीने प्रयाण. दुपारी 2.45 वाजता श्री महेश को. ऑप.स्पीनिंग मिल्स लि. इचलकरंजी ता. हातकणंगले येथे आगमन व सदिच्छा भेट. दुपारी 3.05 वाजता मोटारीने प्रयाण. दुपारी 3.15 वाजता राष्ट्रवादी भवन, राजाराम स्टेडिअम, बंगला रोड, इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथे आगमन. दुपारी 3.15 वाजता पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी व नागरिकांसाठी राखीव. नंतर मोटारीने प्रयाण. सायंकाळी 4.30 वाजता इचलकरंजी महानगरपालिका, इचलकरंजी येथे आगमन. सायंकाळी 4.30 वाजता इचलकरंजी महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा (स्थळ- इचलकरंजी महानगरपालिका सभागृह). नंतर मोटारीने प्रयाण. सायंकाळी 6 वाजता विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला, इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथे आगमन. सायंकाळी 6 वाजता कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा, कोल्हापूर बक्षीस वितरण व समारोप समारंभ. रात्री 8 वाजता राखीव. रात्री 9 वाजता मोटारीने प्रयाण. रात्री 9.25 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. रात्री 9.30 वाजता विमानाने पुणे कडे प्रयाण होणार आहेत.


उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा
Total Views: 12