बातम्या
कोल्हापूरच्या विकास कामांचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आढावा
By nisha patil - 3/28/2025 10:44:28 PM
Share This News:
कोल्हापूरच्या विकास कामांचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आढावा
महालक्ष्मी व जोतिबा मंदिर विकास आराखडे सह महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा
राज्याचे उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती घेण्यासाठी आढावा बैठक घेतली.
यावेळी विकासकामे करत असताना त्या कामांमध्ये दर्जा व गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये तसेच भविष्यातील लोकसंख्येचा विचार करुन त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सोयी-सुविधांची निर्मिती करण्यात यावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
याशिवाय महालक्ष्मी मंदीर विकास आराखडा, जोतिबा मंदिर विकास आराखडा, क्रिकेट स्टेडियम, इंटरनॅशनल कन्व्हेंक्शन सेंटर, संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, कोल्हापूर विमानतळ, पंचगंगा प्रदूषण, शाहू स्मारक भवन, शेंडा पार्क येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम, आयटी हब, शेंडा पार्क येथील रुग्णालय, सारथी संस्था, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण तसंच कोल्हापूर-रत्नागिरी NH-166 आदी विकास कामांचा देखील आढावा घेतला.
यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री नाम.हसन मुश्रीफ, नामदार प्रकाश आबीटकर माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह प्रमुख मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूरच्या विकास कामांचा उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित आढावा
|