बातम्या
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विभागीय क्रीडा संकुल येथील व्यायामशाळेत प्रवेश घेतल्यास फी आकारणीमध्ये सवलत
By nisha patil - 3/22/2025 1:17:00 PM
Share This News:
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विभागीय क्रीडा संकुल येथील व्यायामशाळेत प्रवेश घेतल्यास फी आकारणीमध्ये सवलत
कोल्हापूर दि 21: श्री छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, कोल्हापूर येथे इंडोकाऊंट फाउंडेशन एम. आय. डी. सी गोकुळ शिरगाव, कोल्हापूर यांचे सी.एस.आर.फंडातून नवीन व्यायामशाळेचे बांधकाम सुरु करण्यात आले असून या ठिकाणी अद्यावत व्यायाम साहित्य तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लॉकर्स चेंजिंग रुम इ. सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
या व्यायामशाळेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडू, महिला व नागरीक यांना होण्याच्या दृष्टीने गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर वार्षिक फी मध्ये सुट देण्यात येवून पुरुषांसाठी 5 तर महिलांसाठी 4 हजार रुपये फी आकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खेळाडू व नागरीकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा विभागाचे विभागीय उपसंचालक माणिक पाटील यांनी केले आहे.
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विभागीय क्रीडा संकुल येथील व्यायामशाळेत प्रवेश घेतल्यास फी आकारणीमध्ये सवलत
|