बातम्या
दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या...
By nisha patil - 3/20/2025 12:14:34 PM
Share This News:
दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या...
आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. दिशाचे वडील, सतीश सालियान, यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दावा केला आहे की, दिशाचा मृत्यू अपघाती नव्हता, तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या याचिकेत त्यांनी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह इतर काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत.
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले असून, त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या...
|