बातम्या
लोकशाही दिनी प्रलंबित अर्ज निकाली काढा – अति. जिल्हाधिकारी संजय शिंदे
By nisha patil - 4/3/2025 5:06:59 PM
Share This News:
लोकशाही दिनी प्रलंबित अर्ज निकाली काढा – अति. जिल्हाधिकारी संजय शिंदे
कोल्हापूर (3 मार्च) – लोकशाही दिनी प्रलंबित अर्जांचा त्वरित निपटारा करून नव्याने दाखल अर्जांवर तात्काळ निर्णय घ्या, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात लोकशाही दिनाच्या बैठकीत ते बोलत होते.
या लोकशाही दिनादिवशी नव्याने 166 अर्ज दाखल झाले. त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय - 75, जिल्हा परिषद - 36, इतर विभाग - 55 अर्जांची नोंद झाली.
राज्य शासनाने 100 दिवसांचा गतिमान शासन उपक्रम हाती घेतल्याने, प्रलंबित अर्ज 15 दिवसांत निकाली काढावेत, असे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी काही तास अर्ज निकाली काढण्यासाठी राखीव ठेवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अति. उपायुक्त राहुल रोकडे, उपजिल्हाधिकारी मुद्रांक विवेक वाघमोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनी प्रलंबित अर्ज निकाली काढा – अति. जिल्हाधिकारी संजय शिंदे
|