बातम्या

रात्री झोप चांगली लागत नाही, करा हे तीन योगासन

Do not sleep well at night do these three yogasanas


By nisha patil - 2/5/2024 7:33:19 AM
Share This News:



अनेक लोक रात्री झोप येत नाही म्हणून चिंतीत असतात. पूर्ण दिवसाच्या थकव्यानंतर ते जेव्हा बेड वर लोळतात तेव्हा डोळ्यांमध्ये झोप येत नाही. प्रत्येक व्यक्तीने कमीतकमी 7 ते 8 तासांची झोप जरूर घ्यावी. तसेच अनेक लोकांना झोप येत नाही याकरिता काही योगासने आहेत ती आत्मसात करावी. 

शलभासन-
शलभासनच्या अभ्यासाने स्नायू ओढले जातात. तसेच शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे चांगली झोप येते. हे आसन करण्यासाठी पोटाच्या बाजूने झोपून तळहातांना मांड्यांच्या खाली ठेवा. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना जोडून पंजे सरळ रेषेत ठेवा. हळू हळू पाय वरती घेऊन मोठा श्वास घ्या व काही वेळ याच अवस्थेमध्ये राहावे. 
 
उत्तानासन-
उत्तानासनच्या नियमित अभ्यासाने बेड वर झोपल्यानंतर काही मिनिटांमध्ये झोप यायला लागेल. यामुळे झोपेची समस्या दूर होऊन अनेक आरोग्याच्या समस्या दूर होतील. हा योग्यअभ्यास करण्यासाठी सरळ उभे राहून लांब श्वास घ्या. तसेच हातांना वरच्या बाजूला घेऊन जा. मग श्वास सोडून हातांना जमिनीवर टेकवून पायाच्या अंगठ्याला पकडण्याचा प्रयत्न करावा. 

बालासन- 
रात्री झोपण्यापूर्वी हा योग्यअभ्यास जरूर करावा. या आसनाच्या नियमित अभ्यासाने झोप येते तसेच पोट देखील आरोग्यदायी राहते. पाचन क्रिया सुरळीत राहते. स्नायूंना अराम मिळाल्याने झोप लागते.


रात्री झोप चांगली लागत नाही, करा हे तीन योगासन