बातम्या

किडनी स्टोनसाठी काही घरगुती सोपे उपाय करा.....

Do some simple home remedies for kidney stones


By nisha patil - 4/17/2024 10:27:35 AM
Share This News:



१) तुळस. तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशीची पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित.

२)  कुळीथ.  रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळीथ पाण्यात भिजवून ते सकाळी कुस्करून व गाळून  २-३ महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो.

३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेली आणून त्या जाळून त्याची राख मधातून घ्यावि. स्टोन लवकर  विरघळतात.

४) काकडीचे मगज, ज्येष्ठमध व दारूहळदीचे चूर्ण तांदळाच्या धुवणासोबत घेतल्यास स्टोन विरघळून  बाहेर पडतात.

५)  हळद व एक वर्षापूर्वीचा गूळ नियमित खाल्यास स्टोन तुटुन बाहेर पडतो.

६)  कडुलिंबाच्या पानाची राख २ ग्रँम पाण्यासोबत नियमित खाल्यास मूतखडा विरघळतो.

७)  जर खडा लहान असेल तर मेहंदीचे साल वाटून चूर्ण करावे व  सकाळी अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.

८) पुनर्नवासव, चंद्रप्रभा वटि घ्यावी.

९) पाषाणभेद वनस्पति व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण २ ग्रँम रोज  एक वेळ सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत द्यावे.
 त्यानंतर ४-५  तास काही खाऊ पिऊ नये.

 


किडनी स्टोनसाठी काही घरगुती सोपे उपाय करा.....