बातम्या

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘हा’ व्यायाम करा

Do this exercise to improve memory


By nisha patil - 8/15/2024 7:35:25 AM
Share This News:



चालण्यामुळे शरीर मजबूत होण्यासाठी मदत तर होतेच शिवाय मनावरील तणाव कमी करण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. ज्यांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, त्यांना आपल्या आजारावर मात करण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. तो पर्याय म्हणजे नियमित चालणे. नियमित चालण्यामुळे व्यक्तींची स्मरणशक्ती टिकून राहण्यास मदत होते.

चालण्यामुळे परिसरातील भौगोलिक माहिती आणि नकाशा डोक्यात फिक्स होते. त्यामुळे व्यक्तीला आपल्याला हवे असलेले ठिकाण किती अंतरावर आहे याचा अंदाज येतो. तसेच नियमित चालण्यामुळे तुमच्या अवयवांचा व्यायाम होतो. चालण्यामुळे शरीर मजबूत होण्यासाठी मदत तर होतेच शिवाय मनावरील तणाव कमी होतो. त्यामुळे ज्यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे किंवा ज्यांना आपली स्मरणशक्ती टिकवायची असेल तर आजपासूनच चालणे सुरु करा.इतर कोणत्याही व्यायाम प्रकारांपेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. चालणं हा एक उत्तम व्यायाम जरुर आहे पण त्यामध्ये सातत्य असायला हवे.


स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘हा’ व्यायाम करा