बातम्या
‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या
By nisha patil - 7/19/2024 7:41:53 AM
Share This News:
पोहणे, पूल अॅरोबिक्स आदी, व्यायाम प्रकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित केल्यास गुडघेदुखीचा त्रास थांबू शकतो. तर काही व्यक्तींना तज्ज्ञ स्टेशनरी सायकलिंग क्रॉस ट्रेनिंग सुद्धा करण्यास सांगू शकतात. प्रथम पंधरा मिनिटे नंतर पंचेचाळीस मिनिटांपर्यंत याचा अवधी वाढवत येतो. यासोबत काही साधे व्यायाम प्रकारही करता येतात.
हे व्यायाम करा
स्ट्रेट लेग डेड लिफ्ट्स
दोन्ही हातांनी बारबॅलला समोरच्या बाजूने पकडून तुमच्या ताकदीनुसार त्यावर जोर टाका. पाय व खांद्यांची रुंदी समान ठेवून समोरच्या बाजूने वाकण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या कण्यात बाक ठेवू नये. श्वास सोडत वर उठण्याचा प्रयत्न करा.
नी प्रेस
टॉवेलच्या छोटा लोड तयार करून गुडघ्यांच्या खाली ठेवा. टाचा जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. गुडघ्यांखालील टॉवेल पूर्ण दाबण्याचा प्रयत्न करा. हा प्रकार दहा ते पंधरा मिनिटे रिपिटेशन्सने करा.
बॉक्स सीट्स
उंच खुर्ची अथवा वीस इंची डबा घेवून पायात अंतर घेऊन खुर्चीच्या समोर उभे राहावे. खुर्चीच्या दिशेने झुकून त्यावर बसणार असल्यासारख्या स्थिती यावे. पण न बसता पुन्हा हळूहळू उठावे. यात पंधरा ते वीस रिपिटेशन्स घ्या. पाठीचा कणा ताठ ठेवा.
लेग लिफ्ट
मॅटवर सरळ झोपा. गोल गुंडाळलेला टॉवेल मांडीच्या खालच्या बाजूला आधारासाठी ठेवून लोअर लेग वरच्या दिशेने उचला. पंधरा ते वीस सेकंद याच स्थितीत राहा. पायांना फ्लॅक्स पोझमध्ये ठेवा. यात दहा ते पंधरा रिपिटेशन्स घ्या.
‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या
|