बातम्या
तुम्हीसुध्दा घरात ‘या’ १० गोष्टी वापरता का? जाणून घ्या
By nisha patil - 5/4/2024 7:32:32 AM
Share This News:
आपल्या घरात वापरण्यात येत असलेल्या अनेक गोष्टी आरोग्यासाठी खुप धोकादायक असतात. याबाबत अनेकांना माहिती नसते. एखादी समस्या निर्माण झाल्यानंतर सुद्धा अनेकांना त्याचे कारण समजत नाही. अशा काही धोकादायक उत्पादनाबाबत आपण माहिती करून घेणार आहोत. अशा उत्पादनांचा वापर कमी करावा अथवा वापरच करू नये, हे आरोग्यासाठी चांगले ठरू शकते.
हे आहेत दुष्परिणाम
१ देवघरात लावलेल्या अगरबत्तीमुळे कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड सारखे टॉक्सिन्स तयार होतात.
२ रूम हिटर घरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी करतो. यामुळे श्वास घेण्याचा त्रास होतो. दम्याच्या रूग्णांना त्रास होऊ शकतो.
३ डास पळवणारी कॉइल, लिक्विड यांच्यामुळे हवा दुषित होते. यातील घातक रसायनांमुळे श्वासाचे घातक आजार होऊ शकतात.
४ मेणबत्तीमधून निघत असलेल्या गॅसमध्ये बेंजिन आणि अन्य टॉक्सिन्स असतात. यामुळे श्वासनाचे त्रास होऊ शकतात.
५ वॉशिंग मशीनमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठांचे कपडे एकत्र धुतल्याने इ कोली बॅक्टेरिया पुढील लोडमध्ये पोहचतो. यामुळे डायरिया, पोटाचे आजार होतात.
तुम्हीसुध्दा घरात ‘या’ १० गोष्टी वापरता का? जाणून घ्या
|