बातम्या

कढीपत्ता खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?

Do you know these amazing benefits of eating curry leaves


By nisha patil - 5/9/2024 12:32:33 AM
Share This News:



आजकाल निरोगी जीवनशैलीसाठी अनेकजण व्यायाम, योगा, डाएट अशा गोष्टी करत असतात. तसेच आज आम्ही तुम्हाला कढीपत्ता खाण्याचे काही जबरदस्त फायदे सांगणार आहोत. भारतीय स्वयंपाकघरात कढीपत्ता मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कढीपत्ता कोणत्याही पदार्थाची चव सुधारू शकतो. 

▪️ आरोग्याचा खजिना : 
कढीपत्त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये प्रामुख्याने फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, तांबे, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असे पोषक घटक आढळतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रोज सकाळी 3 ते 4 हिरवी पाने चघळल्यास त्याचा कसा फायदा होतो ते जाणून घेऊया.

▪️ डोळ्यांसाठी चांगले : 
 कढीपत्ता खाल्ल्याने, रातांधळेपणा किंवा डोळ्यांशी संबंधित इतर अनेक रोगांचा धोका टळतो कारण त्यात आवश्यक पोषक व्हिटॅमिन ए आढळते, जे दृष्टी वाढवण्यास मदत करते.

▪️ मधुमेहामध्ये उपयुक्त : 
मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा कढीपत्ता चावण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यात हायपोग्लाइसेमिक गुणधर्म असतात जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात.

▪️ पचन चांगले होईल : कढीपत्ता रोज सकाळी रिकाम्या पोटी चावावा कारण यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, फुगणे यासह पोटाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळते.

▪️ संसर्गापासून संरक्षण : कढीपत्त्यात अँटीफंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे अनेक प्रकारचे संक्रमण टाळता येते आणि रोगांचा धोका टाळता येतो.

▪️ वजन घटवण्यासाठी : कढीपत्ता चघळल्याने वजन आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते कारण त्यात इथाइल एसीटेट, महानिम्बाइन आणि डायक्लोरोमेथेन सारखे पोषक घटक असतात.


कढीपत्ता खाण्याचे 'हे' जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?