बातम्या

काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध.....

Does walking a few steps increase heart rate


By nisha patil - 6/7/2024 11:41:02 AM
Share This News:



हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी चालणं, धावणं किती महत्वाचं आहे. डॉक्टरही नेहमीच धावण्याचा आणि चालण्याचा सल्ला देत असतात. तुम्हीही चालत असाल किंवा रनिंग करत असाल तर तुम्हाला जाणवलं असेल की, रनिंग करताना अचानक हार्ट रेट म्हणजे हृदयाचे ठोके वेगाने होऊ लागतात. काही लोक या गोष्टीला घाबरतात. पण ही एक सामान्य प्रोसेस आहे. मात्र तरीही वॉक करताना किंवा रनिंग करताना हार्ट रेट का वाढतो आणि हार्ट रेट किती असायला हे जाणून घेणार आहोत.

का वाढते हृदयाची धडधड...?
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रनिंग करताना जास्त एनर्जी लागते आणि ही एनर्जी मिळवण्यासाठी मांसपेशींना जास्त एनर्जी आणि ऑक्सिजनची गरज असते. ही गरज पूर्ण करण्याची जबाबदारी हृदयाची असते. हृदय वेगाने रक्त पंप करणं सुरू करतं ज्यामुळे हार्ट रेट वाढतो.

त्याशिवाय धावताना शरीराचं तापमानही वाढतं ज्यामुळे हृदय वेगाने रक्त पंप करून शरीर थंड करण्याचा प्रयत्न करत असतं. धावताना आपल्या शरीरात एड्रेनालाईन आणि कोर्टिसोलसारखे हार्मोन वाढतात. ज्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने होतात.

हार्ट रेट कसा मोजतात...?
हार्ट रेट वाढणं व्यक्तीचं वय, आजूबाजूचं तापमान, फिटनेस लेव्हल आणि वजनावरही अवलंबून असतं. अनेकदा धावताना तणावात असलेल्या लोकांचाही हार्ट रेट वाढतो. हार्ट रेट फार जास्त वाढणंही घातक ठरू शकतं.

किती हार्ट रेट नॉर्मल, कधी व्हावं सावध...
सामान्यपणे एका रनिंग करत असलेल्या व्यक्तीचा हार्ट रेट जाणून घेणं खूप सोपं आहे. रनिंग करताना हार्ट रेट ६० ते १०० बीपीएम असतो. तुम्ही हार्ट मॉनिटरचा वापर करूनही हार्ट रेटची माहिती मिळवू शकता. आजकाल स्मार्ट वॉचमध्येही याची सोय असते.

हृदयाची धडधड वाढणं कशाचा संकेत...
सामान्यपणे पाहिलं तर ज्यांचं वजन जास्त असतं ते काही पावलं चालले किंवा धावले तर त्यांना दम लागतो. त्याशिवाय जर चालताना किंवा रनिंग करताना काही वेळातच त्यांना श्वास भरून येतो. अशात हा हृदयरोगाचा संकेत असतो. अनेकदा हे हार्ट अटॅकचंही लक्षण मानलं जातं. अशात गरजेचं आहे की, हार्टबीट मॉनिटर करत रहा आणि वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. 

 


काही पावलं चालूनच हृदयाची धडधड वाढते? मग वेळीच व्हा सावध.....