बातम्या

उन्हाळ्यात फक्त दही खाऊ नका, त्यात मिसळा १० पैकी १ गोष्ट

Dont just eat curd in summer


By nisha patil - 4/27/2024 7:55:17 AM
Share This News:



'ऊन जरा जास्तच आहे' म्हणण्याची वेळ प्रत्येकावर आली आहे. उन्हाचा पारा चाळीशी पार गेला असून, सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याचं वाटत आहे. या दिवसात शरीराला थंडावा मिळावा, यासाठी आपण थंड पेय किंवा दह्याचे सेवन करतो. दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. दही उष्णतेच्या लाटेपासून शरीराचे सरंक्षण करते.

दही, ताक किंवा लस्सी आपण पितो. पण फक्त दही आपल्या शरीराला पोषण देऊ शकत नाही. शरीराला उन्हाळ्याच्या दिवसात दह्यातून पौष्टीक घटक मिळावे असे वाटत असेल तर, दह्यात आपण १० गोष्टी घालून खाऊ शकता. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतील

उन्हाळ्यात दही खाण्याचे फायदे...
उन्हाळ्यात दही खाल्ल्याने शरीराला थंडावा तर मिळतोच, शिवाय आरोग्यालाही फायदे मिळतात. दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स पोटासाठी खूप फायदेशीर असतात. ज्यामुळे पोटाचे अनेक विकार दूर होतात. शिवाय पचनक्रियाही सुधारते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते...
उन्हाळ्यात संसर्ग होण्याचा धोका वाढतो. दह्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे गुणधर्म असतात, जे उन्हाळ्यातील आजारांपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

त्वचा राहते टवटवीत...
उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या अनेक वेळा वाढतात. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. दह्यातील या गुणामुळे त्वचेच्या संबंधित समस्या सोडवण्यासाठी आराम मिळतो.

हाडांना मिळेल कॅल्शियम...
कॅल्शियम, प्रोटीन आणि पोटॅशियम यांसारखे आवश्यक पोषक घटक दह्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे नियमित दही खाल्ल्याने शरीराला आवश्यक ते सर्व पोषण मिळते.

भूक नियंत्रणात राहील...
दही पौष्टिक असण्यासोबतच भूक नियंत्रित करते. दह्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील कोर्टिसोल उत्पादन कमी होते आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. त्यामुळे दुपारच्या जेवणात नियमित १ वाटी दही खायला हवे.

दह्यात मिसळा १० गोष्टी...
दह्याची चव आणि पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी, आपण त्यात काकडी, पुदिना, धणे, मध, कलिंगड, काळी मिरी पावडर, काळे मीठ, दालचिनी पावडर आणि केळी यांसारख्या गोष्टी घालून खाऊ शकता. यामुळे उन्हाळ्यात शरीराला सुदृढ राहण्यास मदत होईल.


उन्हाळ्यात फक्त दही खाऊ नका, त्यात मिसळा १० पैकी १ गोष्ट