बातम्या
पाटणा कार्यशाळेत डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शन
By nisha patil - 6/3/2025 7:03:08 PM
Share This News:
पाटणा कार्यशाळेत डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शन
कोल्हापूर : इंडियन डेअरी ग्लोबल ग्रोथ लोकल स्ट्रेन्थ, नवी दिल्ली यांच्या वतीने पाटणा (बिहार) येथे 7 मार्चपासून तीन दिवसीय दुग्ध उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत इंडियन डेअरी असोसिएशनचे सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संचालक डॉ. चेतन नरके महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
डॉ. नरके "ब्लॉकचेन श्वेतपत्रिकेद्वारे डेअरी उद्योगाचे डिजिटायझेशन" या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या राष्ट्रीय कार्यशाळेत देशभरातील विविध राज्यांतील दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, दुग्ध व्यवसायातील सध्याची स्थिती, भविष्यातील आव्हाने आणि उपाययोजना यावर सखोल चर्चा होणार आहे.
विशेष म्हणजे, गोकुळ दूध संघाचे संचालक मंडळही या कार्यशाळेत सहभागी होणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सन्मानाची बाब असून, राज्यातील दुग्ध व्यवसायातील प्रगत तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती याबाबतची मांडणी करण्याची संधी डॉ. नरके यांना मिळणार आहे.
पाटणा कार्यशाळेत डॉ. चेतन नरके यांचे मार्गदर्शन
|