बातम्या

डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाला विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद

Dr D Y Patil Polytechnic team won the Divisional Badminton Tournament


By nisha patil - 1/23/2025 5:48:45 PM
Share This News:



डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाला विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद

कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाने इंटर डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील संघांनी सहभाग घेतला.
 

विजयी संघामध्ये अथर्व शिंदे, हेथ छाब्रिया, मितेश पटेल, आणि यश पाटील यांचा समावेश होता. संघाने उपांत्य सामन्यात बीएसआयटी कोल्हापूर, तर अंतिम सामन्यात वायबीआयटी सावंतवाडी संघावर विजय मिळवला. या संघाला राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.
 

संघाला प्राचार्य डॉ. महादेव नरके, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. अक्षय करपे, प्रा. सूरज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, आणि कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांचे प्रोत्साहन मिळाले.


डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाला विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद
Total Views: 21