बातम्या

डॉ. रणजीत निकम यांचा संशोधन उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

Dr Ranjit Nikam honored with Research Excellence Award


By nisha patil - 3/27/2025 4:33:50 PM
Share This News:



डॉ. रणजीत निकम यांचा संशोधन उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

कोल्हापूर  : डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठातर्फे भौतिकशास्त्र विषयातील उल्लेखनीय संशोधन कार्यासाठी डॉ. रणजीत पांडुरंग निकम यांना 'संशोधन उत्कृष्टता पुरस्कार' प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख अतिथी डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. निकम यांनी सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च येथे कार्यरत असताना संशोधन करत असताना १२ शोधनिबंध, १२ पेटंट्स, २० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सादरीकरणे, तसेच उत्कृष्ट सादरीकरणासाठी दोन विशेष पुरस्कार प्राप्त केले.  त्यांनी "केमिकल सिंथेसिस ऑफ कॅडमियम चॅल्कोजेनाइड रिड्यूस्ड ग्राफिन ऑक्साईड कॉम्पोझिट थिन फिल्म्स फॉर फोटोइलेक्ट्रोकेमिकल अँड सेन्सर अॅप्लिकेशन्स" या विषयावर संशोधन प्रबंध पूर्ण केला आहे.

त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, पवारवस्ती, माध्यमिक शिक्षण महर्षी प्रशाला, यशवंतनगर, तर बी.एससी (भौतिकशास्त्र) पदवी शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज येथे झाले. शिवाजी विद्यापीठातून  त्यांनी एम.एससी पदवी संपादन केली.

डॉ. निकम यांना संशोधन संचालक आणि  सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व अध्यापक,  सहकारी संशोधक आणि व्यवस्थापनाचे सहकार्य मिळाले. त्यांच्या संशोधन कार्यास छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (सारथी) फेलोशिप तसेच आर्थिक सहाय्य प्राप्त झाले आहे. 

या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.


डॉ. रणजीत निकम यांचा संशोधन उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान
Total Views: 7