शैक्षणिक

डॉ. प्रभुदास खाबडे यांना पीएचडी पदवी...

Dr prabhudas khabde


By nisha patil - 4/4/2025 2:38:07 PM
Share This News:



डॉ. प्रभुदास खाबडे यांना पीएचडी पदवी...

आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते सत्कार

हेरले गावचे प्राध्यापक डॉ. प्रभुदास खाबडे यांना लोकमान्य टिळक विद्यापीठ, पुणे येथून "मा. काशीराम व प्रकाश आंबेडकर यांचे बहुजन समाजाचे राजकारण" या विषयावर पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक, गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यावर पीएचडी पूर्ण केल्याबद्दल आमदार मिणचेकर यांनी डॉ. प्रभुदास खाबडे यांचे कौतुक केले. "चळवळीचा परिपूर्ण अभ्यास करून मिळवलेले हे ज्ञान समाजासाठी उपयुक्त ठरेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मा. सभापती राजेश पाटील, उपसरपंच निलोफर खतीब, विजय भोसले आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.


डॉ. प्रभुदास खाबडे यांना पीएचडी पदवी...
Total Views: 20