बातम्या

तुळशीच्या बियांचं पाणी पिऊन मिळतात हे जबरदस्त फायदे

Drinking water of Tulsi seeds has tremendous benefits


By nisha patil - 12/8/2024 7:31:44 AM
Share This News:



बदलत्या वातावरणात शरीराची काळजी घेणं फार गरजेचं असतं. हिवाळ्यात बऱ्याच लोकांना सर्दी-खोकला होण्याची आणि ताप येण्याची समस्या होते. अशात लोक वेगवेगळे आयुर्वेदिक उपाय करून या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक सोपा आणि चांगला उपाय म्हणजे तुळशीच्या बीया. तुळशीच्या बियांचं पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात आणि अनेक आजारही दूर राहतात.

ब्लड शुगर लेव्हल...
शरीर फीट आणि निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला चुकीच्या सवयी बंद करणं गरजेचं असतं. जर तुम्ही रोज तुळशीच्या बियांचं पाणी प्यायलात तर तुमची ब्लड शुगर लेव्हल  कंट्रोलमध्ये राहते.

डिहायड्रेशन...
डिहायड्रेशनची समस्या असलेल्या लोकांनी हे पाणी प्यायला हवं. रोज तुळशीच्या बियांचं पाणी प्यायल्याने तुम्हाला ही समस्या होणार नाही.

एसिडिटी...
जर तुमचं पोट नेहमीच खराब होत असेल तर तुम्ही तुळशीच्या बियांचं पाणी रोज प्यायला हवं. या पाण्यामुळे पोटात गॅसची आणि अॅसिडिटीची समस्या होणार नाही.

लठ्ठपणा...
अलिकडे अनेकांना लठ्ठपणाची समस्या होत आहे. अनेकदा प्रयत्न करूनही लठ्ठपणा कमी होत नाही. अशात या पाण्याने तुम्हाला फायदा मिळू शकतो.

इम्यूनिटी बूस्ट...
तुळशीच्या बियांचं पाणी प्यायल्याने इम्यूनिटी बूस्ट होते आणि सर्दी, तापसारख्या समस्या या दिवसात होत नाहीत.

 


तुळशीच्या बियांचं पाणी पिऊन मिळतात हे जबरदस्त फायदे