बातम्या

भेंडी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे.

Eating okra has health benefits


By nisha patil - 10/6/2024 12:20:40 AM
Share This News:



भेंडीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यामुळं शरीरातील रक्ताचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. याशिवाय अन्नपचनक्रियाही सुधारते. त्यामुळंच भेंडीला सुपरफूड मानलं जातं. त्याचबरोबर भेंडीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील कमी असतो. त्यामुळं शरीराला आवश्यक पोषकघटक मिळतात. आणि मधुमेह, रक्तदाबाची समस्या कमी होते.

याशिवाय गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठीही भेंडी ही फायदेशीर मानली जाते. महिलांनी भेंडीचं सेवन केल्यास त्यांच्या शरीराला आवश्यक पोषकतत्व मिळतात. बाळंतपण झालेल्या महिलांनी भेंडीचं सेवन केल्यास त्यांना अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे मिळत असतातभारतातल्या लोकांना अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करायला आवडतं. भेंडी ही त्यातलीच एक चविष्ट आणि आरोग्यदायी भाजी मानली जाते. भेंडीत असलेल्या अनेक गुणधर्मांमुळं त्याचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे असतात. भेंडीत असलेल्या फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह असल्यानं त्याचं सेवन करणं हे आरोग्यासाठी फायदेशीर मानलं
वजन कमी करण्यासाठी
भेंडीमध्ये कॅलरी कमी असतात, १०० ग्रॅम भेंडीमध्ये केवळ ३३ कॅलरी असतात. त्यामुळे ही भाजी वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. पण केवळ भेंडीची भाजी खाऊन वजन कमी होईल अजिबात नाही. पण याने वजन कमी होण्यास मदत नक्कीच होऊ शकते. 

हृदयरोगांपासून बचावासाठी

भेंडीमध्ये असलेल्या पेक्टिन विरघळणारं फायबर शरीरात कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. आणि याप्रकारे भेंडी हृदय रोग रोखण्यासाठी फायदेशीर ठरते. भेंडीमध्ये असलेल्या करसेटिन तत्व कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिकरण रोखण्यास मदत करतं. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होऊ शकतो. 

डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी

फायबर भरपूर प्रमाणात असलेली भेंडी पचन क्रियेसाठी आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच भेंडी अ‍ॅंटी डायबिटीक गुण एंजाइम मेटाबॉलिज्म कार्बोहायड्रेटला कमी करण्यासाठी आणि इंसुलिनचं उत्पादन वाढण्यासाठी मदत करते. 

इम्यूनिटी मजबूत करा

भेंडीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे आपली इम्यूनिटी मजबूत होते आणि वेगवेगळ्या रोगांशी आणि इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते. १०० ग्रॅम भेंडी आपली व्हिटॅमिन सी ची ३८ टक्के गरज भागवते. त्यामुळे भेंडीची भाजी खाणे फायदेशीर ठरते.


भेंडी खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे.
Total Views: 2