बातम्या

ईद फेस्टिवल बिंदू चौकात संपन्न – महिलांसाठी खास आकर्षण

Eid festival concludes at Bindu Chowk


By nisha patil - 3/25/2025 7:45:39 PM
Share This News:



ईद फेस्टिवल बिंदू चौकात संपन्न – महिलांसाठी खास आकर्षण

कोल्हापूर | प्रतिनिधी प्रतिवर्षीप्रमाणे ईद फेस्टिवल बिंदू चौक, कोल्हापूर येथे उत्साहात सुरू झाला आहे. या फेस्टिवलचे उद्घाटन मा. हाजी बादशाह बाबुभाई बागवान (शुगर फैक्टरी चीफ केमिस्ट) यांच्या हस्ते करण्यात आले.

फेस्टिवलमध्ये हैदराबाद, दिल्ली, मुंबई येथून आलेल्या विविध सौंदर्यप्रसाधनांचे आणि महिलांसाठी विशेष वस्तूंचे स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. महिलांची मोठी गर्दी पाहता अक्कमहादेवी मंडपात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यंदा सामाजिक बांधिलकी जपत, ना नफा ना तोटा तत्वावर १० किलो कांदा फक्त १८० रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेली २७ वर्षे सलगपणे हा उपक्रम आयोजित केला जात आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जयेशभाई कदम (महाभारत ग्रुप, माजी महापौर) होते. प्रमुख उपस्थिती –

मा. सौ. निलोफर आजरेकर (माजी महापौर)

मा. श्री. आर. के. पोवार (माजी महापौर)

मा. श्री. संजय कदम (उद्योगपती)

मा. श्री. हरिदास सोनवणे (माजी उपमहापौर)

मा. श्री. ईश्वर परमार, मा. श्री. राजू यादव

मा. सलीम शेख, मा. हाजी जहांगीर अत्तार, मा. मलिक बागवान (चेअरमन)

मा. हाजी लियाकत मुजावर, मा. रफिक मुल्ला, समीर बागवान

सौ. वर्षा मोरे, सौ. अलका सोमवंशी, शोभा शिंदे

रियाज कागदी, मुसा कुलकर्णी


फेस्टिवलचे संस्थापक गणी आजरेकर असून, रहिम महात, मुस्ताक ताशिलदार, अब्दुलहमीद मिरशिकारी (लाल्या), निलेश भोसले, जमील बागवान यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली आहे.

या फेस्टिवलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, कोल्हापूरकरांसाठी हा एक आनंदाचा उत्सव ठरत आहे.


ईद फेस्टिवल बिंदू चौकात संपन्न – महिलांसाठी खास आकर्षण
Total Views: 18