बातम्या
एलॉन मस्क यांच्यावर 'नाझी सॅल्यूट' चा आरोप..
By nisha patil - 1/23/2025 2:09:17 PM
Share This News:
एलॉन मस्क यांच्यावर 'नाझी सॅल्यूट' चा आरोप..
मस्क यांचे टीकाकारांना कडवट उत्तर..
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यातील एलॉन मस्क यांच्या एका कृतीवरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मस्क यांनी केलेल्या हावभावाला काही टीकाकारांनी नाझी सॅल्यूट म्हणून संबोधले. या आरोपानंतर वादाला तोंड फुटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी वेळी मस्क यांनी केलेल्या कृतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.टीकाकारांनी मस्क यांच्यावर फॅसिस्ट प्रतीकांचा अवलंब केल्याचा आरोप करत त्यांना नाझी जर्मनीशी जोडले. या प्रकरणावर एलॉन मस्क यांनी तीव्र प्रतिक्रिया देत आरोप फेटाळून लावले. मस्क यांनी ट्विट करत सांगितले, “विरोधकांना आता चांगल्या घाणेरड्या युक्त्यांची गरज भासू लागली आहे. कोणालाही हिटलरशी जोडणे आता कंटाळवाणे आणि हास्यास्पद झाले आहे.”या वादानंतर सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
एलॉन मस्क यांच्यावर 'नाझी सॅल्यूट' चा आरोप..
|