बातम्या

आपली स्मरणशक्ती वाढवणे

Enhancing your memory


By nisha patil - 5/7/2024 7:21:17 AM
Share This News:



सध्याच्या वैज्ञानिक व आधुनिक धकाधकीच्या युगात पदोपदी आपणास स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेक मोठमोठ्या जाहिराती वाचायला किंवा ऐकायला मिळतात त्या जाळ्यात आपण गुरफटत जातो व म्हणेल तेवढा पैसा खर्च करतो.
आपल्या घरातच काही गोष्टीचा वापर करून आपण आनंदी व निरोगी जीवन जगत आपली स्मरणशक्ती अधिक प्रमाणात वाढू शकतो .
जे लोक शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या सक्रीय राहतात त्यांचा मेंदू लवकर संकुचित होत नाही व त्याबरोबर आपले वाढत्या वयाचा सुद्धा त्यांच्या शरीरावर  व त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम दिसून येत नाही .
काही संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्रिय राहतात त्यांच्या मेंदूचे फार थोड्या प्रमाणात नुकसान दिसून आले तर जे शारीरिक व मानसिकदृष्ट्या निष्क्रिय राहतात त्यांच्या मेंदूचे अधिक प्रमाणात नुकसान दिसून आले .
आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण निसर्गतः काही गोष्टी करू शकतो.
 दररोज मोकळ्या वातावरणात हवेशीर पायी फिरत जाणे त्यामुळे मोकळ्या व शुद्ध हवेमुळे आपणास भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतो राहते जेणेकरून आपल्या मेंदूच्या रक्त संचलनाचा वेग वाढविण्यास मदत मिळते .
आपले मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा कोणत्याही प्रकारचा ताण मनावर ओढून घेऊ नये त्याचबरोबर स्वतःला तणावापासून व गोंधळ या पासून दूर ठेवा .
निरुपयोगी टी-व्ही नको त्या बातम्या पहाण्या ऐवजी चांगल्या बातम्या ऐकण्याची व अध्यात्मिक पुस्तके वाचण्याची सवय ठेवा .
काही हलकेसे योगासन , नाडीशुद्धी प्राणायाम , भ्रमरी प्राणायाम , ओंकार अशी प्राणायाम नित्यनियमाने पहाटे करीत चला .
 पुरेपूर झोप ही आपणास आवश्यक आहे त्यामुळे आपली वाया गेलेले एनर्जी परत मिळण्यास मदत मिळते व मेंदूला ते आवश्यक असते त्यामुळे मेंदूचे काम सुरळीत व जलद होण्यास मदत मिळते आपण झोप घेतो त्यावेळी आपणास नवीन ऊर्जा मिळवतो .
 दररोज रात्री पाण्यात अक्रोडच्या चार बिया भिजत ठेवावे व सकाळी ते खावे त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते .
चार ते पाच काजू ची पावडर व मध एकत्र खावे त्यामुळे सुद्धा स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते .
 दो तीन बदाम ची पावडर व सुंठ पावडर दुधासोबत घेत राहावे .
रात्री झोपताना दोन चमचे मध पाण्यासोबत घ्यावे व सकाळी अनुशापोटी पाणी मध पीत राहावे .
 मधामध्ये आवळा मुरब्बा तयार करावा ते फार लाभदायक ठरते .
 गव्हांकुराचा रस घेत राहिल्यास सुद्धा आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत  मिळते .
आपल्या डोक्याला गावरान गायीच्या तुपाने रात्री झोपताना मसाज करावे .
 जर नियमितपणे गुलकंद सुद्धा सेवन करत राहिल्यास अति लाभ होते .
दहा-बारा तुळशीचे पाने , पाच-सहा काळी मिरे , चार-पाच बदाम व थोडेसे मध एकत्र बारीक करून थंड पाण्यासोबत शरबती सारखे पीत राहावे .
 पंचवीस-तीस ग्रॅम लोणी आठ ते दहा काळीमिरी पावडर व खडीसाखर एकत्र करून खावे .
 बडीशोप व खडीसाखर समप्रमाणात पावडर करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर एक किंवा दोन चमचे खावे .
 जेवणामध्ये नियमितपणे हिरव्या पालेभाज्यांचा समावेश जरूर असावा  .
आता वरील पैकी एक किंवा दोन उपाय आपण करावे त्याच बरोबर आपल्या जीवन शैलीत बदल घडवावा धूम्रपान , मद्यपान , अति जागरण , अति झोप , कोणतेही व्यसन , इर्षा , द्वेष , अहंकार हे सर्व गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करावा .
 त्याचबरोबर संमोहन शास्त्र म्हणजे  ( हिप्नॉटिझम ) चा उपचार घ्यावा .अधिक माहीतीसाठी माझ्याशी संपर्क करावा किंवा आपल्या जवळच्या निसर्गोउपचार तज्ञाचा सल्ला घ्यावा .


आपली स्मरणशक्ती वाढवणे